languagesoftware.net - which is the best language course or software - compare

Learn French with Frantastique

प्रणेत्याबद्दल

A photo of Simon Ager, author of Omniglot, taken on Roman Camp in Bangor on 19th March 2017

माझे नाव सायमन एगर (Simon Ager) आहे; मी वेल्स (Wales) देशातील बँगर (Bangor) शहरात निवास करतो व ह्या संकेतस्थळाद्वारे उदरनिर्वाह करतो. मी मूळचा इंग्लंड (England) देशाच्या वायव्येस स्थित लेंकेशायर (Lancashire) शहरातील आहे.

मी जाणता झाल्यापासूनच मला भाषांनी भुरळ घातली आणि मी काही भाषांचा अभ्यास करून त्यांना अंगिकृत करण्यात विविध स्तरांवर यशस्वी झालो. मँडरिन (Mandarin), फ्रेंच (French), वेल्श (Welsh) आणि आयरिश (Irish) ह्या भाषा मला कमी-जास्त प्रमाणात चांगल्या येतात; जर्मन (German), स्पॅनिश (Spanish), जॅपनीज (Japanese), स्कॉटिश गेलिक (Scottish Gaelic) आणि मँक्स (Manx) ह्या भाषा मला बर्‍यापैकी जमतात; इटॅलियन (Italian), पोर्तगीज (Portuguese) आणि एस्पेरांतो (Esperanto) ह्या भाषा मला थोड्याफार प्रमाणात वाचता येतात व कळतात; आणि झेक (Czech), टाईवानीज (Taiwanese) आणि ब्रिटिश चिह्न भाषा (British Sign Language) ह्यांचे केवळ प्राथमिक ज्ञान मला आहे.

माझ्या भाषा शिकण्याच्या प्रवासाबद्दल सविस्तर वृत्तांत.

भाषा शिकण्याव्यतिरिक्त गायन, संगित वादन व श्रवण, वाचन, भ्रमंती, जलतरण, स्केटिंग, सायकलिंग, युनीसायकलिंग आणि जगलिंग, हे माझे छंद आहेत; आणि पुरातत्वशास्त्र ते जैवशास्त्र अशा विविध विषयांमधे मला ऋची आहे.

तुम्ही ओम्निग्लॉट (Omniglot) ला मदत करण्यासाठी पेपाल (PayPal) मार्फत दान करू शकता :

Donations can be made in UK pounds

or in US dollars

किंवा तुम्ही ह्या संकेतस्थळाला इतर प्रकारे देखिल मदत करू शकता.

Translated into Marathi by Siddhant Bhaware (सिद्धांत भवरे)

Information about Marathi | Useful phrases in Marathi | Tower of Babel in Marathi

About me in other languages

About this site | Omniglot - a potted history | About me | My language learning adventures | My singing adventures | My songs | My tunes | My musical adventures | My juggling adventures


Cheap Web Hosting